फोंडाघाट महाविद्यालयात IQAC  विभागाअंतर्गत कार्यशाळा संपन्न.

फोंडाघाट महाविद्यालयात IQAC  विभागाअंतर्गत कार्यशाळा संपन्न.

*कोकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात IQAC  विभागाअंतर्गत कार्यशाळा संपन्न.*

*उच्च शिक्षण हाच परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे*-डॉ. प्रमोद मेश्राम*

*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*

कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मधील अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाच्यावतीने, एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामधील प्राध्यापक उपस्थित होते.नॅकसाठी SSR  अहवाल कशा पद्धतीने तयार करायचा या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालय पाचल, जिल्हा रत्नागिरी येथील प्राचार्य डॉ. प्रमोद मेश्राम आणि याच महाविद्यालयाचे, नॅकसमन्वयक डॉ. संजय निंबाळकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. प्रमोद मेश्राम म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वच महाविद्यालयांची परिस्थिती सारखीच असते. काही शैक्षणिक उपक्रम हे संयुक्त विद्यमाने राबविल्यास, त्याचा निश्चितच उपयोग दोन्ही महाविद्यालयांना होत असतो. यासाठीच दोन महाविद्यालयामध्ये सामंजस्य करार करून शैक्षणिक उपक्रमांची देवघेव करता येते. अशा उपक्रमामुळे शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढण्यास मदत होते. महाविद्यालयीन उच्च हाच सर्व क्षेत्रांचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक विकासाला चालना मिळते असते.
प्रा. संजय निंबाळकर म्हणाले, पूर्वीप्रमाणे सध्या नॅकचे कामकाज किंवा अहवाल राहिलेला नसून, त्यामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे महाविद्यालयीन स्तरावर, राबविलेल्या उपक्रमांची माहिती, डिजिटल पद्धतीने सर्वापर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी अनेक माध्यमांचा वापर करता येतो.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सतीश कामत आपल्या अध्यक्षीय भाषणात नॅकला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी याविषयी बोलताना दैनंदिन महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे काम सर्वत्र चालूच असते पण प्राध्यापकांनी महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे काम करत असतानाच, सहशैक्षणिक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण केली पाहिजे, असे म्हणाले. सामंजस्य करारामधून आपल्या महाविद्यालयाबरोबरच, इतर महाविद्यालयांमधील प्राध्यापक, विद्यार्थी यांच्या भेटी घेऊन, शैक्षणिक ज्ञानाची शिदोरी सर्वांना दिली पाहिजे. नवनवीन संकल्पना, प्रदेशानुसार बदलत असतात. त्यांची अदलाबदल करून, उपक्रम राबवता येतात.  यासाठी प्रयत्न सर्वांनी केले पाहिजेत. असे उपक्रम करत असताना या सर्व घटकांच्या नोंदी करून त्याचे डॉक्युमेंटेशन करून फाइल्स तयार केल्या पाहिजेत.
या कार्यशाळेमध्ये,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आले. यावेळी सामंजस्य करारावर दोन्ही महाविद्यालयाच्या प्राचार्य व समन्वयाच्या स्वाक्षऱ्या करून संबंधितांनी त्याचे आदानप्रदान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन, नॅकसमन्वयक डॉ.राजाराम पाटील यांनी केले. तर प्रा. वि.वि.पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!