*कोकण Express*
*छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरण सुशोभीकरणासाठी नगराध्यक्ष मानधनाची सहा महिन्यांची रक्कम*
*कणकवली नगराध्यक्षांचा स्तुत्य उपक्रम*
*यापूर्वी देखील कोविड काळात व शहीद जवानांच्या कुटूंबियांना देण्यात आली होती मानधनाची रक्कम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण व स्थलांतराला करिता शहराचा प्रथम नागरिक म्हणून कणकवली शहरातील सर्व्हिस रोड वर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण व सुशोभीकरणासाठी सहा महिन्याचे नगराध्यक्षपदाचे मानधन सुमारे 90 हजार रुपयांची रक्कम छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ यांना देण्याची घोषणा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली. यापूर्वी नगराध्यक्षपदाचे मानधन रोजंदारीवर असणाऱ्या मजुरांना कमळ थाळी करिता व त्यापूर्वी नगराध्यक्षपदाच्या मानधनाची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. त्याच प्रमाणे पुढील सहा महिन्याचे मानधन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या करिता देण्यात येणार आहे. यापूर्वी कणकवली नगरपंचायत कडून पुतळा स्थलांतरना करिता पाचशे चौरस फुटाच्या जागेचा ठराव व त्या अनुषंगाने बाबी नगरपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवल्या आहेत. पालकमंत्री व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पुतळा स्थलांतरण या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना पालकमंत्र्यांकडून या 18 गुंठे जागेची मोजणी देखील करून घेण्यात आली. त्यामुळे कणकवली शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी या कामाकरिता माझा हातभार लागावा म्हणून हा निर्णय घेतल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, ऍड विराज भोसले, महेश सावंत आदी उपस्थित होते.