*कोकण Express*
*भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांना न्यायालयीन कोठडी ; जामीन अर्ज करण्यास मार्ग मोकळा*
शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी संदेश उर्फ गोट्या सावंत यांना कणकवली न्यायालयाने १६ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली होती.त्यानुसार त्यांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने पुन्हा दुपारी कणकवली न्यायालयात पोलीस हजर केले असता २ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी न्यायाधीश एस.ए. जमादार यांनी सुनावली आहे. जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा व सत्र न्यायालयात गोट्या सावंत यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
यावेळी सरकारी पक्षातर्फे ॲड. प्रदीप घरत तर आरोपींच्यावतीने ॲड. राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला.