*कोकण Express*
*वैभववाडी तालुक्यातील नानिवडे वाडेकरवाडी येथील रस्त्याच्या कामाचा सतिश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ…*
*जिल्हा वार्षिक योजनेतून ५ लाख रु मंजूर*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातुन नानिवडे गावातील वाडेकरवाडी येथील रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे ( रु. ५ लाख) पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केले. या रस्त्याचे भूमिपूजन माजी जिल्हा बँक अध्यक्ष तसेच शिवसेना जिल्हा नेते श्री. सतिश सावंत यांनी आज केले. वाडेकरवाडी येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द सावंत यांनी अवघ्या सहा महिन्यात पूर्ण केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी युवासेनेचे जिल्हा चिटणीस- स्वप्नील धुरी यांच्या माध्यमातून नानिवडे गावचे शाखाप्रमुख- दिपक साळवी,बुथप्रमुख- प्रवीण वाडेकर यांनी सतीश सावंत यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
*यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे,तालुकाप्रमुख मंगेश लोके, माजी बँक संचालक दिगंबर पाटील, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी,अल्पसंख्याक तालुका प्रमुख जावेद पाटणकर, उपतालुका संघटक बाबा मोरे, उपविभाग प्रमुख गौस पाटणकर,नानिवडे सरपंच संगीता कातकर , दीपक साळवी , प्रवीण वाडेकर,राजेश पवार,भिकाजी साळवी,तुकाराम गावडे,बाळकृष्ण गोरुले, महेश शिवगण,गोपाळ जोशी, जयवंत वाडेकर, बबन वाडेकर यांसह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.