*कोकण Express*
*निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोडी केली त्यांना नोटीसा बजावणार…!*
*दोडामार्ग तालुका भाजपाची कार्यकारिणी बरखास्त…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दोडामार्ग मध्ये गेली दोन महिने भाजपा अंतर्गत कुरघोडी करत होते.पक्षांतर्गत रोज काही नेते एकमेकांना टीका करत होते.त्यामुळे तालुका भाजपाची कार्यकारिणी बरखास्त करत आहोत.पुन्हा सर्वांना एकत्र करुन पुन्हा नव्याने निवड केली जाईल. भाजपा पेक्षा कुणीही मोठं नाही.त्यामुळे महेश सारंग व प्रमोद कामत हे पुढील निवडी पर्यत काम करणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.जिल्हा बँकेसह अन्य निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोडी केली त्यांनाही नोटीसा बजावल्या जाणार आहेत.
कणकवली येथे भाजपा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजन तेली बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष संतोष कानडे,सभापती मनोज रावराणे,उपाध्यक्ष सोनू सावंत,बबलू सावंत,सुशील सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
आजपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्या लोकांना नोटिसा दिल्या जातील.त्याच्यावर कारवाई केली जाणार आहेत.दोन लोकांना आज नोटिसा दिल्या जाणार आहेत.आगामी काळात माझे अधिकार काय हे दाखवून देणार असल्याचा इशारा राजन तेली यांनी दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड झाली,दोन भाजप व दोन महाविकास आघाडी नगराध्यक्ष झाले आहेत. शिवसेनेचे दोन आमदार,एक खासदार असताना एक नगराध्यक्ष झाला,तरीही आनंदोत्सव साजरा केला जात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला त्याची कीव करावी वाटते.राज्यात सत्तेत पक्ष असूनही नगराध्यक्ष जिंकता येत नाही.उलट भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून सर्वात जास्त नगरसेवक जिंकले,भाजपने आपली ताकद कायम ठेवली असल्याचा विश्वास राजन तेली यांनी व्यक्त केला.
काही लोक चित्र रंगवताहेत की,फार मोठा पराभव केला.अशी वस्तुस्थिती नाही.अपेक्षित जागा आल्या नाहीत,त्यांचे सगळयांना सोबत घेऊन विचार करू,जिल्हापरिषद व पंचायत व ३ नगरपंचायत जिकण्यासाठी काम केले जाईल.शिवसेनेला आजही सत्ताकेंद्र असताना आघाडी करुन निवडणूक लढवावी लागते.जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आमदार व कार्यकर्त्यांवर दडपशाही केली जात आहे.पुढच्या निवडणुकीत एक दिलाने आम्ही सामोरे जाणार आहोत.मध्यतरी आम्ही गोव्यात होतो, त्यामुळे सरकारच्या विरोधातील आंदोलने थांबली होती. आता ही आंदोलने केली जाणार आहेत. सरकारला याचे उत्तर निश्चित द्यावेच लागेल,असा इशारा राजन तेली यांनी दिला.