*कोकण Express*
*गोट्या सावंत कणकवली न्यायालयात..!*
*सिंधुदुर्ग : दि. १४ :*
शिवसैनिक संतोष परब प्रकरणात संशयित आरोपी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज कणकवली न्यायालयात सकाळी ११ च्या दरम्यान हजर झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वकील राजेंद्र राव राणे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलीस सतर्क झाले आहेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर गोट्या सावंत यांना न्यायालयीन कोठडी की पोलीस कोठडी? याबाबत कणकवली न्यायालय कोणता निर्णय देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

