*कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सभापती सौ.नूतन आईर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर सकाळी १० वाजल्यापासून उपोषण सुरू*

*कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सभापती सौ.नूतन आईर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर सकाळी १० वाजल्यापासून उपोषण सुरू*

*कोकण Express*

*कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सभापती सौ.नूतन आईर यांचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर सकाळी १० वाजल्यापासून उपोषण सुरू*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी.याकरीता मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना कुडाळ पंचायत समिती सभापती सौ.नूतन आईर यांनी निवेदन दिले असून,जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने सुध्दा चौकशीचे आदेश दिलेले आहेत.असे असताना देखील वारंवार खालील मुददयांवर चौकशीची मागणी करून देखील त्याबाबत जिल्हा परिषदेकडून सिंधुदुर्ग अदयापपर्यंत कोणतीच कार्यवाही केलेली नाही कोणाच्या तरी दबावामुळे सदर चौकशीस विलंब होत असल्याचे सभापती सौ.नुतन आईर यांचे मत आहे.तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती कुडाळ यांचेकडून मागविण्यात आलेली माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. कार्यालयातील नस्तींची छायांकीत प्रत देणेसाठी एवढा वेळ का लागत आहे.हा समाधिनाचा भाग आहे.सदर मनमानी कारभाराविरद्ध आवाज उठविणेकरीता कुडाळ पंचायत समितीच्या सभापती सौ.नुतन आईर यांनी आज शुक्रवार दि.११ फेब्रुवारीपासून उपोषणाला सकाळी १० वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.*

*कुडाळच्या सभापती सौ.नुतन आईर यांनी मागणी केलेले बोकम्पचे खालील मुद्दे*

*गवंडी प्रशिक्षणासाठी कुडाळ तालुक्याला मिळालेल्या 9,60,300/- निधी वर्दे व आंब्रड गावामध्ये प्रशिक्षण न घेता कागदोपत्री दाखवून निधी लाटला.*

*महिलांसाठी हिरकणी कक्षावर 2.42,000/- दि. 31.03.2019 ला 2 लाख खर्च केले व त्याच कक्षाला अस्मिता कक्ष नाव देवून दि 24-08-2020 रोजी 104.000/- खर्च केले.*

*अभिलेख बांधणीसाठी 1.48,000/- च साधारण 3000 मीटर कापड खरेदी केले, शासनाचे नियम धाब्यावर बसवून करण्यात आली आहे.*

*पांग्रड येथे 20% सेस जि.प. निधीतून चहाणवाडी रस्त्यावर काम न करता 2,90,000/ एवढी रक्कम पंचायत समिती स्तर टेंडर लावून खर्च केले.*

*कुडाळ पंचायत समिती इमारतीवर पाणी संकलनाच्या नावाखाली किरकोळ काम करून 3,00,000/- खर्च केले. 6. पांग्रड समाज मंदिराच्या पूर्वीचच उप्पर दाखवून 2,00,000/- खर्च केले.*

*पंचायत समिती मधील राऊत कर्मचारी 2020 पासुन पंचायत समिती मध्ये एक दिवस हजर होता त्याचा पगार काढला व नियमवाय रजा मंजूर केली.*

*पांग्रड मध्ये नियमबाहय पध्दतीने पुरुष देवस्थानावर 15 वा वित्त आयोगातून र.रु.1.00 (लक्ष) खर्च केला 9. पंचायत समिती धर्मवीर सभागृह अल्पवत सभागृह यावरती रंगरंगोटी दाखवून 86,000/- खर्च केले.*

*10 पंचायत समिती रेकॉर्ड रूम वरती 2-14000/- खर्च केले 11 पंचायत समितीसाठी संगणक खरेदी 198,000/- खर्च केले.प्रत्यक्षात नविन खरेदी केली नाही अस्मिता रूम बंद असतांना 18,000/- हजार की सैनेटरी नॅपकीन मशीन खरेदी केले तसेच “सॅनेटरी नॅपकीन बेडींग मशीन 100 ची खरेदी केली.*

*यशवंत पंचायत राज अभियान बक्षीस रक्कमची मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.इमारत सजावट रंगरंगोटी हपावर खरेदी कागदोपत्री दाखवून त्यातील काही खरेदी केलेल्या वस्तुंची अवास्तव किंमत दाखून भ्रष्टाचार केलेला आहे.*

*शासकीय वाहनाचा गैरवापर गेली अनेक वये गट विकास अधिकारी हे तालुक्याच्या मुख्यालयी न राहता ते कणकवली येथे राहत असून त्यांच्या रोज येणेजाणेसाठी त्यांचे अधिनस्त असलेले वाहन MH 07 1605 गाडीचा तालुक्याच्या बाहेर नेवून दुरुपयोग करीत आहेत व खोटे लॉगबुक भरून तालुक्या अंतर्गत फिरती दाखविली जात आहे. 15 पंचायत समिती अंतर्गत दर 03 वर्षांनी कर्मचा-यांची टेबल बदलणे व दर 05 वर्षांनी कर्मचा-यांची अन्य विभागात बदली करणे आवश्यक असताना काही ठरावीक कर्मचा-यांना भ्रष्टाचारात सहकार्य करणेसाठी वर्षे त्याच ठिकाणी कायम ठेवणेत आले आहे. त्यांची तात्काळ बदली होणे आवश्यक आहे शिक्षण विभाग सारखा महत्वाच्या विभागात पद रिक्त ठेवून अश्या कर्मचा-यांना पंचायत समितीमध्ये ठेवण्यात आले आहे.*

*राष्ट्रीय महामार्ग क्र.66 लगत 01 किमी परिसरात झाडे लावणे आवश्यक असताना सुमारे 103 कि.मी. अंतरावर नियमबाहय चुकीच्या पद्धतीने झाडे लावून स्वतःच्या नावावरती,रु.1,07,904/- एवढया रक्कमेचा लाभ घेतलेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!