*कोकण Express*
*सिंधुदुर्गात आज नवे ११ कोरोना पॉझिटिव्ह…*
*एकाच कोरोनामुळे मृत्यू..*
*सिंधुदुर्गनगरी,ता.०८:*
जिल्ह्यात आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ११ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ५५ हजार १२७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.