सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

*कोकण Express*

*सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ…*

*सिंधुदुर्गातील पत्रकारिता सकारात्मक,जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोलाचे योगदाान*

*माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्गातील पत्रकारिता सकारात्मक आहे. जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने भरविण्यात आलेले मैत्रीपूर्ण क्रिकेट सामने त्यांच्या अंगातील लेखणी पलीकडील कलागुणांना नक्कीच वाव देतील, असाही विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तालुका पत्रकार संघाच्या वतीने भरविण्यात आलेल्या “इडमिशन” पुरस्कृत “बाळशास्त्री जांभेकर चषक’ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन श्री.केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ॲडमिशन संस्थेचे संदीप नाटलेकर, जयराम जाधव, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सचिव प्रसन्ना राणे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, मोहन जाधव, राजेश मोंडकर, विजय देसाई,अमोल टेंबकर, हरिश्चंद्र पवार, उमेश सावंत, मयुर चराटकर,विनोद दळवी,सचिन रेडकर, दीपक गावकर,नागेश पाटील,नंदू महाजन,प्रमोद ठाकूर, प्रदीप सावंत,ममता पाटणकर, सुहास देसाई,विजय पालकर, बंटी केनवडेकर,लक्ष्मीकांत भावे, शुभम धुरी,निखिल माळकर, विनायक गावस,हर्षल नळेकर, विनय वाडकर,रोहन गावडे, जतिन भिसे, सिद्धेश सावंत, रणजित जाधव, संदेश कारीवडेकर,भूषण आरोसकर आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर पुढे म्हणाले, सावंतवाडी पत्रकार संघाने आयोजित केलेला जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य आहे. जिल्ह्यातील पत्रकार एकत्र आले. त्यातून त्यांच्यात असलेला एकोपा पुन्हा एकदा दिसून आला आहे. जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा मोठा वाटा आहे. मात्र आज भरविण्यात आलेले सामन्यांच्या माध्यमातून त्यांच्यातील लेखणी पलीकडील कलागुणांना वाव मिळणार आहे. यापुढे पत्रकारांनी असे उपक्रम राबवून आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान भरवण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेला सकाळ पासून प्रारंभ झाला असून सायंकाळी उशिरापर्यंत हे सामने सुरू राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!