*कोकण
*१४ रोजी मोफत आरोग्य तपासणी, उपचार शिबीर*
*आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथक च्या वतीने आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
१४ फेब्रुवारी रोजी कणकवलीतील आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथक च्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबीर व विनामूल्य औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ठीक ३ ते ७ या वेळेत श्री स्वयंभू विद्यामंदिर शाळा क्र.२ बांधकरवाडी कणकवली येथे हे शिबीर आयोजित केले आहे. तरी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये अनुभवी डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन तसेच निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात येतील. अधिक माहितीसाठी
संपर्क- 7350847345

