मला ठाकरे सरकार अटक करू शकले नाही ; स्वतः सरेंडर झालो

मला ठाकरे सरकार अटक करू शकले नाही ; स्वतः सरेंडर झालो

*कोकण Express*

*मला ठाकरे सरकार अटक करू शकले नाही ; स्वतः सरेंडर झालो*

*जेव्हा बोलेन तेव्हा अनेकांची बोलती बंद होईल*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

मी पहिल्या पासूनच पोलिसांना सबंधित अधिकाऱ्यांना जी जी माहिती हवी होती, ती मदत देत होतो. त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करत होतो. न्यायलयाने घालून दिलेल्या अटी शर्थी प्रमाणे यापुढे देखील ज्या प्रमाणे सहकार्य करत आलो तसेच सहकार्य करणार आहे. जबाबदार लोक प्रतिनिधी म्हणून आज पर्यंत सहकार्य केले आहे. मला कोणीही अटक करू शकले नसून, मी स्वतः सरेंडर झालो. त्यावेळी मला सर्वोच्च न्यायालयाचे आणखी चार दिवस संरक्षण होते. परंतु त्या दिवशी जिल्हा न्यायालयासमोर ज्या पद्धतीने माझी गाडी अडविण्यात आली, माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये म्हणून स्वतः सरेंडर झालो. त्यानंतर मला केवळ दोन दिवसाचीच पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर माझी प्रकृत्ती बिघडल्याने मला रुग्णालयात दखल करण्यात आले. आता काही दिवस मी आराम करणार असून, त्यानंतर पक्षाने दिलेल्या जबाबदारी नुसार गोवा आणि मुंबई मध्ये जाणार आहे. अशी प्रतिक्रिया त्यानी जिल्हा कारागृहातून जामीनाची प्रक्रिया पार पाडून बाहेर पडल्यावर दिली आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, ज्या दिवशी मी बोलेन त्या दिवशी ब्लड प्रेशर चे त्रास सुरू होतील असा इशारा देखील त्यानी यावेळी विरोधकांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!