*कोकण Express*
*आ. नितेश राणे यांची वैभववाडी भाजपा पदाधिकार्यांनी घेतली भेट : तब्येतीची केली विचारपूस*
जामीन मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या आमदार नितेश राणे यांची वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी पडवे येथे भेट घेतली. सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्या तब्येतीची विपूस केली.
कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आमदार नितेश राणे फोंडाघाट मार्गे जिल्ह्यात दाखल झाले. दरम्यान वैभववाडीतील भाजपा कार्यकर्ते फोंडा येथे त्यांच्या स्वागतासाठी जमा झाले होते. फोंडा येथे आ. नितेश राणे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. व कार्यकर्ते आ. राणे यांच्यासोबत ओरोसकडे रवाना झाले.
पडवे येथे आमदार नितेश राणे यांची भाजपा कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, उपसभापती अरविंद रावराणे, हुसेन लांजेकर, किशोर दळवी, बाबा कोकाटे, नगरसेवक रोहन रावराणे, संजय रावराणे, बबलू रावराणे, सुनील भोगले, बाळा हरयाण, राजू पवार, रितेश सुतार, नवलराज काळे, सौ. चोरगे, शुभांगी पवार, सिमा नानिवडेकर रत्नाकर कदम सर्व नगरसेविका, नगरसेवक उपस्थित होते.

