*कोकण Express*
*नाधवडे उमाळा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री प्रजित नायर साहेब यांची जि.प.सदस्य सुधिर नकाशे समवेत भेट*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री डॉक्टर प्रजित नायर साहेब यांनी नाधवडे येथे पर्यटन क्षेत्र उमाळा याला भेट दिली या वेळी माहिती देताना या गावचे सुपुत्र जि प सदस्य सुधिर नकाशे तालुक्याचे गट विकास अधिकारी जयप्रकाश परब साहेब नाधवडे गावचे ग्रामसेवक नदाफभाऊ तसेच तालुक्याचे प्रत्येक खात्याचे खाते प्रमुख उपस्थित होते नाधवडे गावचे बारमाही वाहणाऱ्या उमाळा हा पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावा यासाठी आर्किटेक्चर प्लॅन करून इथे पाहिजे असलेल्या पर्यटन दृष्ट्या सुखसुविधा रस्ता बाग बगीचे याचे आर्किटेक्चर प्लॅन व इस्टीमेंट पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या या उमाळ्याचे महत्व नैसर्गिक दृष्ट्या आबादीद राहण्यासाठी सल्ला देण्यात आला आहे याच उमाळा मुळे नापणे धबधबा हा बारमाही वाहणारा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे.

