*कोकण Express*
*शाई फेक प्रकरणी कणकवली नगरपंचायत अधिकारी – कर्मचाऱ्यांचे काम बंद*
*अमरावती येथील घटनेचा केला निषेध !*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अमरावती महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर जमावाने शाई फेक केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ कणकवली नगरपंचायतच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन सुरू केले. या घटनेचा अवधूत तावडे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी निषेध केला. यावेळी
मुख्याधिकारी अवधुत तावडे, किशोर धुमाळे, विनोद सावंत, रवी महाडेश्वर, प्रवीण गायकवाड, प्रतिष खैरे, विभव करंदीकर, प्रशांत राणे, सचिन नेरकर, सतीश कांबळे, मनोज धुमाळे, विद्यासागर अतिग्रे, ध्वजा उचले, निकिता पाटकर, रुचिता ताम्हणकर, महेश राणे, माधुरी डगरे, अनंत कुबल, अमोल भोगले, रोहन डिचोलकर आधी अधिकारी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

