*कोकण Express*
*कणकवलीचे जिल्हापरिषद पंचायत समितीचे मतदारसंघ वाढणार*
कणकवली तालुक्यात आता ८ जिल्हा परिषद, १६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. मात्र पुढील निवडणुकांसाठी जिल्ह्यात प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार केला जात आहे. कणकवली तालुक्यात नांदगाव जिल्हापरिषद नवा मतदारसंघ होणार असून दोन पंचायत समिती नव्याने होणाऱ्या प्रभाग रचनेत अस्तित्वात येणार आहेत. त्याचा फटका प्रस्थापित लोकप्रतिनिधींना बसणार आहे. निवडणूक विभागाने वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करत जिल्हापरिषद व पंचायत समिती मतदारसंघांमध्ये बदल होणार आहेत. तालुक्यात ९ जिल्हा परिषद व १८ पंचायत समिती होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्वच प्रभागातील गावांमध्ये अदलाबदल होणार आहे. त्याचा फटका सर्वच विद्यमान लोकप्रतिनिधी व इच्छुकांना बसणार आहे. तालुकानिहाय प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे मंगळवारी सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या ५० जिल्हा परिषद व १०० पंचायत समिती मतदारसंघ आहेत. त्यात ५ जिल्हापरिषद व १० पंचायत समिती मतदार संघाची आता वाढ होणार आहे.