कुडाळ मालवणच्या आमदार महोदयांनी गगनबावडा घाट रस्त्याची पहाणी करून फोटोबाजी करण्यापेक्षा सोनवडे घाट मार्गाच्या कामाचे काय झाले याचे स्पष्टीकरण करावे

कुडाळ मालवणच्या आमदार महोदयांनी गगनबावडा घाट रस्त्याची पहाणी करून फोटोबाजी करण्यापेक्षा सोनवडे घाट मार्गाच्या कामाचे काय झाले याचे स्पष्टीकरण करावे

*कोकण  Express*

*कुडाळ मालवणच्या आमदार महोदयांनी गगनबावडा घाट रस्त्याची पहाणी करून फोटोबाजी करण्यापेक्षा सोनवडे घाट मार्गाच्या कामाचे काय झाले याचे स्पष्टीकरण करावे..*

*सन 2016 पासून नुसती भूमीपुजनं.. प्रत्यक्षात कामाचा मुहूर्त कधी मिळणार ?*

*निवडणुकांच्या तोंडावर चालणारा “गाजर” वाटप कार्यक्रम अजून किती वर्षे चालणार..मनसेचा खरमरीत सवाल*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक एकीकडे गगनबावडा घाटरस्त्याची पाहणी करून फोटोबाजी करतात, मात्र दुसरीकडे आपल्याच मतदार संघात येणाऱ्या सोनवडे घाटमार्गाच्या कामाची सद्यस्थिती बाबत चकार शब्द काढायला तयार नाहीत हे दुर्दैव आहे. घाटमार्गाच्या कामात मागील पाच वर्षात एक साधी वीट का रचली गेली नाही ह्याचं स्पष्टीकरण आमदार महोदयांनी जनतेला द्यावं असा टोला मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी लगावला आहे. मागील पाच वर्षांपासून खासदार विनायकजी राऊत व आमदार वैभवजी नाईक दरवर्षी निवडणुकांच्या तोंडावर भूमीपुजन कार्यक्रमांची नौटंकी करून जनतेची फसवणूक करत आहेत. प्रत्यक्षात मागील पाच वर्षात सोनवडे घाट रस्त्यासाठी दमडीचा निधी देखील आणू शकले नसल्याने घाटमार्गाचे काम अधांतरी राहिले आहे ही खरी शोकांतिका आहे. या सोनवडे घाटमार्गासाठी एवढी निवेदने व आंदोलने करुन देखील राज्य सरकारला जागं येणार नसेल तर सत्ताधारी शिवसनेनेच्या लोकप्रतिनिधींनी तसे जनतेसमोर जाहीर करावे नाहीतर प्रत्यक्षात कामकाजास कधी सुरुवात होणार याचे स्पष्टीकरण द्यावे अशी खरमरीत टीका मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!