राज्यस्तरीय पाॅवरपाँईट प्रेझेंटेशन मध्ये तोंंडवली फार्मसी काॅलेजच्या कु.हुमेरा खान व सैमूर बांगी यांनी तृतीय क्रमांक पटकावला

राज्यस्तरीय पाॅवरपाँईट प्रेझेंटेशन मध्ये तोंंडवली फार्मसी काॅलेजच्या कु.हुमेरा खान व सैमूर बांगी यांनी तृतीय क्रमांक पटकावला

*कोकण Express*

*राज्यस्तरीय पाॅवरपाँईट प्रेझेंटेशन मध्ये तोंंडवली फार्मसी काॅलेजच्या कु.हुमेरा खान व सैमूर बांगी यांनी तृतीय क्रमांक पटकावला*

*कासार्डे  ः संजय भोसले*

संत गजानन महाराज रूरल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तसेच संत गजानन महाराज रूरल फार्मसी कॉलेज कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत  श्री सरस्वती इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी तोंडवली महाविद्यालयातील प्रथम वर्ष डी. फार्मसीच्या  विद्यार्थिनी  कु. हुमेरा खान व सैमून बांगी या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावला.राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.

या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयातील १४० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता.त्याच प्रमाणे श्री सरस्वती इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी तोंडवलीच्या कु.हुमेरा व सैमून यांनी इफेक्ट ऑफ डिप्रेशन या विषयावर  पोस्टर प्रेझेंटेशन केले होते. त्याच्या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत सर्वच परीक्षकांनी कौतुक केले. सध्याच्या वातावरणात डिप्रेशन या महत्ताच्या विषयावर करण्यात आलेले सादरीकरण विशेष महत्त्व असल्याने या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष वसंत सावंत,सचिव निखिल सावंत , प्राचार्य तुकाराम केदार , प्रा. विलास मुढे व इतर शिक्षकेतर कर्मचारी  यांनी अभिनंदन केले. विद्यार्थिनींना प्रा. स्नेहल शिंदे  यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!