काँग्रेसमध्ये राणे असताना प्रमोद जठार यांनी स्वतः राणेंवर केलेल्या टीकात्मक विधाने आठवावी

काँग्रेसमध्ये राणे असताना प्रमोद जठार यांनी स्वतः राणेंवर केलेल्या टीकात्मक विधाने आठवावी

*कोकण  Express*

*काँग्रेसमध्ये राणे असताना प्रमोद जठार यांनी स्वतः राणेंवर केलेल्या टीकात्मक विधाने आठवावी*

*प्रमोद जठार यांचा आत्मा रिफायनरीमध्ये अडकला ; राणे कुटुंबियांवर प्रेम नसून ग्रीन रिफायनरी मार्गी लागावी यासाठी जठार प्रयत्नन*

*माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची टीका*

*कणकवली ः प्रतिनिधी*

प्रमोद जठार यांची अवस्था अडकीत्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली आहे. जशी आवळा सुपारी चघळून फेकून देतात तशीच गत जठार यांची झाली असल्याची प्रखर टीका माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली. भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी सूडबुद्धीने नितेश राणेंवर दबाव आणून राज्य सरकार कारवाई करत असल्याची टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार सतीश सावंत यांनी घेतला.

काँग्रेसमध्ये राणे कुटुंबीय असताना प्रमोद जठार यांनी स्वतः राणेंवर केलेल्या टीकात्मक विधाने आठवावीत. प्रमोद जठार यांचा आत्मा रिफायनरीमध्ये अडकला आहे. त्यांना राणे कुटुंबियांवर प्रेम नसून ग्रीन रिफायनरी मार्गी लागावी यासाठी जठार प्रयत्न करताहेत. रिफायनरी पूर्ण होण्यासाठी नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणेंना खुश करण्याचे प्रयत्न जठार करताहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपा कार्यालयात नितेश राणेंनी सोडलेल्या म्हैशी जठार विसरलेत. खासदारकीचे तिकीट स्वतःला मिळण्यासाठी जठार राणेंची तळी उचलत आहेत. संतोष परबवर 18 डिसेंबरला हल्ला झाला आणि त्यानंतर सचिन सातपुतेला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून नितेश राणेंचे नाव या हल्ल्यात आले. त्यानंतर अगदी सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे कोर्टाला शरण गेले. नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. जर संतोष परबवर हल्ला होऊन त्याला 18 टाके पडल्यावर केंद्रीयमंत्री राणेंनी परबला खरचटले म्हटले होते तसेच नितेश राणेंना ऍसिडिटीमुळे छातीत दुखत असेल, असे म्हटल्यास वावगु ठरू नये. जरी मी राणेंसोबत होतो तरी बेकायदेशीर कृत्यावेळी मी साथ दिली नाही. गाड्या जाळपोळ, भाजपा तालुकाध्यक्षाला झालेली मारहाण, चिखलफेक सारख्या प्रकरणात मी सोबत नव्हतो, असे माजी जिल्हा बँक सतीश सावंत यांनी सांगितले.

प्रमोद जठार यांनी राणे विरोधात असताना नितेश राणे आणि नारायण राणेंवर केलेले आरोप खोटे होते काय ? असा सवाल सावंत यांनी केला. तसे असेल तर आता राणेंची तळी उचलणाऱ्या प्रमोद जठार आणि जनतेची माफी मागावी, असे आवाहन सावंत यांनी केले. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड शहरप्रमुख शेखर राणे, नगरसेवक कन्हैया पारकर, उपतालुकाप्रमुख राजू राणे, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!