महामार्गावरील शिवसेना कार्यालयासमोर दोन वाहने एकमेकांना धडकली

महामार्गावरील शिवसेना कार्यालयासमोर दोन वाहने एकमेकांना धडकली

*कोकण  Express*

*महामार्गावरील शिवसेना कार्यालयासमोर दोन वाहने एकमेकांना धडकली*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई गोवा महामार्गावरील कणकवलीतील शिवसेना जुन्या मध्यवर्ती कार्यालया जवळील सर्विस रोड येथे दोन चारचाकी मध्ये झालेल्या अपघातात नेक्सॉन कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. ही घटना आज सकाळी ७.२० वा. दरम्यान घडली.
मिळालेल्या माहिती नुसार, तेथिलच खासगी रुग्णालयाचे डॉक्टर आपल्या नेक्सॉन कारने सर्विस रोडवरून जात असताना अचानक कामगारांना नेणारी बोलेरो चारचाकी त्याच सर्विस रोडवर रिव्हर्स (मागे) आल्याने बोलेरो व नेक्सॉन कार मधे धडक झाली. या अपघातात नेक्सॉन कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. तर अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच याबाबतची माहिती सबंधितांनी पोलीस स्थानकात दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!