शिवसेना सिंधुदुर्ग प्रभार उपजिल्हाप्रमुख पदी अमरसेन सावंत यांची निवड

शिवसेना सिंधुदुर्ग प्रभार उपजिल्हाप्रमुख पदी अमरसेन सावंत यांची निवड

*कोकण Express*

*शिवसेना सिंधुदुर्ग प्रभार उपजिल्हाप्रमुख पदी अमरसेन सावंत यांची निवड..*

सिंधुदुर्ग,दि.२२:

स्व. पुष्पसेन सावंत यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांची शिवसेना सिंधुदुर्ग प्रभारी उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आल्याचे पत्र जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिले.

जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या शिफारसीने जिल्हा परिषद सदस्य अमरसेन पुष्पसेन सावंत मुक्काम-पोस्ट कुडाळ यांची शिवसेना सिंधुदुर्ग प्रभारी उपजिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र कुडाळ) तालुका या पदी निवड करण्यात येत आहे.

*_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!