राजकारणाप्रमाणे क्रिकेट मधेही आमदार वैभव नाईक यांनी केली फटकेबाजी

राजकारणाप्रमाणे क्रिकेट मधेही आमदार वैभव नाईक यांनी केली फटकेबाजी

*कोकण  Express*

*राजकारणाप्रमाणे क्रिकेट मधेही आमदार वैभव नाईक यांनी केली फटकेबाजी*

*असरोंडी येथील क्रिकेट स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन*

राजकारणामध्ये ज्याप्रमाणे आमदार वैभव नाईक फटकेबाजी करतात त्याचप्रमाणे क्रिकेट क्षेत्रातही त्यांनी आज उत्कृष्ट फटकेबाजी केली. बॅट आणि बॉलचा योग्य ताळमेळ साधत खेळलेल्या क्रिकेट शॉटने उपस्थितांची वाहवा मिळवीली. निमित्त होते ते प्रशांत सावंत मित्रमंडळ व कुलस्वामिनी भवानी स्पोर्ट असरोंडी आयोजित क्रिकेट स्पर्धेचे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आयोजकांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, स्थानिक क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्याबद्ल क्रिकेट स्पर्धा आयोजकांचे मी अभिनंदन करतो.प्रशांत सावंत मित्रमंडळाच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात त्यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. आजचे तरूण हे आपले उद्याचे भविष्य आहेत त्यामुळे अशा सामाजिक कार्यक्रमातून त्यांना ताकद देण्याचे आपण काम केले पाहिजे. तरुणांनी देखील आपल्या आवडीच्या प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करावे, नेतृत्व करण्याची संधी सोडू नये,असरोंडी मुख्य रस्ता दर्जेदार केलेला आहे. गावातील इतर रस्ते, मोबाईल टॉवर, शाळेसाठी सभामंडप हि कामे करण्यात आली. येत्या काळातही असरोंडी गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली.


याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, आडवली मालडी विभागप्रमुख बंडू चव्हाण, विभाग संघटक संतोष घाडी, माजी विभागप्रमुख दीपक राऊत, संजय पारकर, सचिन आचरेकर, शाखा प्रमुख सुनील सावंत,पोलीस पाटील लवू सावंत, प्रशांत सावंत, राजू घागरे, प्रदीप सावंत, जेष्ठ ग्रामस्थ मोहन परब, बाळा बागवे, सचिन परब, राजू सावंत, अजय गावडे, अनिल सावंत, रवी गावडे, कांता हातणकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!