*कोकण Express*
*नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (जुना भाजीपाला मार्केट, आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) यांच्या वतीने मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील जेष्ठ कलाकार *रमेश देव * यांना श्रध्दांजली अर्पण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दिनांक ०४/०२/२०२२ रोजी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (जुना भाजीपाला मार्केट, आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली)*आपण आहात म्हणून आम्ही* *ॐ नमो भगवते भालचंद्राय * तसेच पोलीस दलातील मित्र यांच्या वतीने मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील जेष्ठ कलाकार *रमेश देव * यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली
यावेळी श्री अशोक करंबेळकर (जेष्ठ पत्रकार) यांनी आदरांजली अर्पण करताना असे म्हटले की,
वयाच्या ५ व्या वर्षी ” बाल कलाकार ” ते वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत “चिरतरुण कलाकार ” म्हणून रमेश देव यांची कलाक्षेत्रातील कारकीर्द हि प्रत्येक मराठी माणसाला अभिमानास्पद गोष्ट आहे, नाट्य-चित्रपट (मराठी, हिंदी) -दुरदर्शन मालिका कोणतेही माध्यम असो किंवा नायक, खलनायक, चरित्र अभिनेता, सहाय्यक अभिनेता या पैकी कोणतीही भूमिका असो , रमेश देव कधीही साचेबद्ध झाले नाहीत
आणि असा चतुरस्र कलाकार पुन्हा होणे नाही, प्रत्येक भुमिकेत प्रत्येक दौऱ्यात आलेल्या अनुभवातून शिकत त्यांनी मराठी कलाजगत तर गाजवलेच पण राष्ट्रीय पातळीवर यश मिळविण्यासाठी हिंदी माध्यमात शिरकाव करुन तेथे हि आपले अढळ स्थान निर्माण केले,
रमेश देव यांच्या निधनाने कला जगताचे खरोखरच नुकसान झाले आहे, आणि प्रत्येक मराठी, भारतीय प्रेक्षकांना ते जाणवत आहे,
रमेशजींच्या देखणे पणाला “सीमा” नव्हती. वृध्दत्वाबरोबरच्या संघर्षात तुम्ही “अजिंक्य ” ठरला. अभिनय हाच तुमचा श्र्वास… हेच तुमचे जीवन
अशा शब्दांत श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
यावेळी उपस्थित सर्वांनी पुष्पांजली अर्पण करून श्रध्दांजली वाहीली