*कोकण Express*
*खारेपाटण-कोष्टीआळी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…*
*खारेपाटण ःःप्रतिनिधी*
शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुकर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या उपस्थितीत खारेपाटण कोष्टी आळीतील १५ कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या कार्यक्रमावेळी शिवसेना कणकवली तालुका प्रमुख शैलेश भोगले, उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर, सामाजिक कार्यकर्ते सुकांत वरूनकर, खारेपाटण तळेरे उपविभाग प्रमुख दयानंद कुडतरकर, वारगाव सरपंच बापू नर, जेष्ठ कार्यकर्ते अनंत गांधी, संजय राऊत, युवा कार्यकर्ते तेजस राऊत, सुनील कर्ले, शिवाजी राऊत, गिरीश पाटणकर, संतोष गाठे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये के. सी. सी. मित्रमंडळ खारेपाटणचे अध्यक्ष उत्तम रोडी, प्रदीप निग्रे, संतोष लोकरे, राजेंद्र रोडी, सचिन निग्रे, बाळ्या कांबळी, यश रोडी, अमित कांबळी, अनिकेत निग्रे, जीवन पोयेकर, शेखर निग्रे, प्रविणा निग्रे, प्रसाद अडीवरेकर, आदेश अफंडकर आदींचा समावेश आहे. या सर्वांचे स्वागत सतीश सावंत यांनी शिवबंधन बांधून केले. तसेच सर्व कार्यकत्यांच्या पाठिशी शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली.