ही तर सतीश सावंत-सिंधुदुर्ग पोलीस यांची मिलीभगत : दादा साईल यांचा आरोप

ही तर सतीश सावंत-सिंधुदुर्ग पोलीस यांची मिलीभगत : दादा साईल यांचा आरोप

*कोकण  Express*

*ही तर सतीश सावंत-सिंधुदुर्ग पोलीस यांची मिलीभगत : दादा साईल यांचा आरोप*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

राजकीय फायदा मिळविण्यासाठी संतोष परब हल्ला प्रकरण हे सतीश सावंत यांनी रचलेले कटकारस्थान आहे. काल सतीश सावंत यांनी तथाकथित संतोष परब याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन आमदार नितेश राणे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी पोलिस तपासतील काही गोपनीय मुद्दे सर्वांसमोर उघड केले आहेत, असा आरोप भाजप ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केला आहे. सदर प्रकरणात हल्ला करण्याचा आरोप असलेल्या सचिन सातपुते यांना कोणी फोन केले ? कोणी फोटो पाठवले? हे अजून पोलिस तपासात सिद्ध व्हायचे असताना सतीश सावंत यांनी ही माहिती कोणाकडून मिळाली याचा शोध घेणे गरजेचे आहे.
एकंदर परिस्थिती पाहता या सर्व प्रकरणात राज्य सरकारने सर्व पोलीस यंत्रणेला कामाला लावून आपल्या अविवेकी बुद्धीचे दर्शन दाखवून दिले आहे. या सर्व प्रकरणाचा राजकीय फायदा मिळवण्याचा सतीश सावंत केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांना स्वतःच्या मतदारसंघातून बँकेमध्ये संचालक होत नाही होता येत नाही, त्यांनी आमदार नितेश राणे यांना यांच्यावर आरोप करणे हे खरोखरच हास्यास्पद आहे. त्यामुळे सतीश सावंत यांनी अशा प्रकारचे आरोप करण्यापूर्वी आपली पार्श्वभूमी सुद्धा पडताळून पाहणे गरजेचे आहे.
या संपूर्ण प्रकरणात कालच्या पत्रकार परिषदेत सतीश सावंत यांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणी पोलीस तपासातील बाबी सार्वजनिकरित्या उघड केल्याविरोधात आम्ही न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार दाखल करणार आहोत, असं ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!