*कोकण Express*
*कणकवली उपसभापती पदी मिलिंद मेस्त्री यांचे नाव निश्चित*
कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीत मिलिंद मेस्त्री यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. कणकवली पंचायत समितीत 16 पैकी 15 सदस्य भाजपचे असल्याने ही निवड जवळपास बिनविरोध होणार हे निश्चित आहे. निवडणुकीकरिता पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार आर जे पवार यांच्याकडे श्री मेस्त्री यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी सभापती मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी उपसभापती प्रकाश पारकर, दिलीप तळेकर, देवगड सभापती रवी पाळेकर, महेश लाड, भाग्यलक्ष्मी साटम, तृप्ती माळवदे, हर्षदा वाळके, सुचीता दळवी, शामसुंदर दळवी आदी उपस्थित होते. दुपारनंतर ही निवडणूक होणार असून, उपसभापती पदी मिलिंद मेस्त्री यांची वर्णी लागणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या नामनिर्देशन पत्रा वर सूचक म्हणून महेश लाड यांचे नाव दिले आहे.