प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थीना सभापतींनी दिल्या भेटी

*कोकण Express*

*प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थीना सभापतींनी दिल्या भेटी*

*तातडीने घरे पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना;समस्या घेतल्या जाणून*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यांमध्ये आवास दिन कार्यक्रमानिमित्त संपूर्ण तालुक्यात झोनल ऑफिसर यांच्या मार्फत प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थीना भेटी देण्यात आल्या. घरे पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. नवीन प्रस्ताव सादर करण्याबद्दल सूचना दिल्या आहेत . फोंडाघाट ग्रामपंचायत येथे आवास दिनानिमित्त एकाच दिवशी वीस घरकुलांचे लाभार्थींना सभापती दिलीप तळेकर आदेश दिले आहे.

यावेळी माजी सभापती सुजाता हळदीवे,पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, सरपंच संतोष आग्रे,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत लाड,विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग,झोनल अधिकारी सुनील पांगम,सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद पालकर,ग्रामविकास अधिकारी
श्री.चौलकर उपस्थित होते.
तसेच पात्र लाभार्थी यांची आढावा सभा घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यात आल्या. तसेच कातकरी समाजातील १८ कातकरी समाज लाभार्थ्यांना वस्तीला भेट देण्यात आली. त्यांच्या समस्या एकूण घेऊन घरकुले मंजूर करण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन सभापती दिलीप तळेकर यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!