विकासजी गुरव यांची भारतीय मजुर संघ सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

विकासजी गुरव यांची भारतीय मजुर संघ सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड

*कोकण  Express*

*विकास गुरव यांची भारतीय मजुर संघ सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड..*

*राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते , विमा व्यावसायिक श्री मंगेश (बाळा) साळसकर यांच्या वतीने भारतीय मजुर संघ सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल *सन्मानिय श्री विकासजी गुरव साहेब * यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सन्मानित करण्यात आले
यावेळी श्री मंगेश साळसकर यांनी गौरवोद्गार व्यक्त करताना असे म्हटले
दिवस असो वा रात्र सर्वांच्या हाकेला धावून जाणारे,आपल्या सोबतीत सर्वांना घेऊन मार्गदर्शन करत धुरा वाहणारे ,कुटुंबातील व्यक्ती म्हणूनचं सर्वांशी स्नेहसंबंध निर्माण करणारे असे मनाने निर्मळ,मनमिळावु व्यक्तिमत्व आमचे परममित्र- *सम्मा. विकासजी गुरव साहेब* यांची *भारतीय मजुर संघ सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी* निवड झाल्याबद्दल मनपुर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या
यावेळी श्री विकास जी गुरव म्हणाले की हा सत्कार माझ्या पुढील काळात सर्वच क्षेत्रात कार्यरत असताना मला नव्यानेच उमेद देत राहिल
यावेळी उपस्थित जिल्हा संघटनमंत्री ओमकार गुरव, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र आरेकर,महाराष्ट्र प्रदेश सदस्य हेमंत कुमार परब, संगणक ऑपरेटर अखिल गुरव, बांधकाम कामगार संतोष शिरसाठ या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!