गाेपुरी आश्रमात संदेश पारकर यांचे उद्या आत्‍मक्लेश आंदोलन

गाेपुरी आश्रमात संदेश पारकर यांचे उद्या आत्‍मक्लेश आंदोलन

*कोकण  Express*

*गाेपुरी आश्रमात संदेश पारकर यांचे उद्या आत्‍मक्लेश आंदोलन…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शहरालगतच्या गोपुरी आश्रमात शिवसेना नेते संदेश पारकर हे उद्या आत्‍मक्लेश आंदोलन करणार आहेत. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे आंदोलन असेल. जनतेने निवडून दिलेल्‍या आमदारांनी जनतेची काम करायची असतात. पण कणकवलीचे आमदार गुन्हेगारी कृत्‍यामध्ये सहभागी होतात. हल्‍ल्‍याचा कट रचतात या प्रवृत्तीचा निषेध म्‍हणून हे आत्‍मक्लेश आंदोलन असल्‍याची माहिती श्री.पारकर यांनी दिली.

गोपुरी आश्रमातील अप्पासाहेब पटवर्धन पुतळ्याजवळ उद्या (ता.४) हे आत्‍मक्लेश आंदोलन सुरू होईल. यात कणकवली मतदारसंघातील जनताही सहभागी होणार आहे. पक्ष म्‍हणून नव्हे तर कणकवलीतील सर्वसामान्य नागरिक म्‍हणून आपण आत्‍मक्‍लेश आंदोलन करत आहोत अशी माहिती श्री.पारकर यांनी दिली.

ते म्‍हणाले, सिंधुदुर्गच्या इतिहासात प्रथमच एका आमदाराने दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्याला संपविण्याचा कट रचला. त्‍याच्यावर खुनी हल्‍ला घडवून आणला आहे. ही घटना संपूर्ण कणकवलीवासीयांसाठी शरमेची बाब आहे. असा आमदार कणकवलीकरांचा लोकप्रतिनिधी असणे ही त्‍याहुन दुदैवाची बाब आहे. त्‍यामुळेच गोपुरी आश्रमात जाऊन आपण आत्‍मक्लेश आंदोलन करणार आहोत.

संतोष परब खुनी हल्‍ला प्रकरणात पोलिसांनी चांगली कामगिरी बजावली. सरकारी वकीलांनीही चांगली बाजू मांडली. त्‍यामुळेच हल्‍ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्‍या आमदार नीतेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी होऊ शकली. सिंधुदुर्गातील दहशतीचीही प्रवृत्ती ठेचली जावी. प्रत्‍येक मतदारामध्ये दहशतीविरोधात आवाज उठविण्याची ताकद निर्माण व्हावी यासाठी आपण आत्‍मक्लेश आंदोलन करत असल्‍याचे श्री.पारकर म्‍हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!