*कोकण Express*
*कासार्डे तिठ्यावर माघी गणेश जयंत्तीनिमित्त कार्यक्रमांची रेलचेल*
*कासार्डे ः संजय भोसले*
कासार्डे तिठ्ठा येथे शिवसेना विभागप्रमुख श्री सुधाकर पेडणेकर याच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सव शुक्रवार दि. ४ फेब्रु. व शनिवार दि. ५ फेब्रु. 2022 रोजी आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शुक्रवार दि. ४ फेब्रु. सकाळी नऊ वा. श्री. सत्यनारायण महापूजा, अकरा वाजता गणेश पूजन, दुपारी बारा ते दोन महाप्रसाद, दुपारी एक वाजता बुवा कु.स्नेहल संतोष तळेकर याचे सुस्वर भजन, सायं पाच वाजता पारंपरिक डबलबारी भजनांचा जंगी सामना बुवा श्रीधर मुणगेकर विरूद्ध बुवा लक्ष्मण गुरव यांच्यात होणार आहे.तसेच शनिवार दि. ५ फेब्रु. २०२२ सकाळी साडेनऊ वाजता डबलबारी भजनांचा जंगी सामना बुवा संतोष मिराशी विरूद्ध बुवा दिगंबर केसरकर याच्यात होणार आहे. संपूर्ण कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून होणार असल्याचे व्यवस्थापक श्री दत्तात्रय सेवा मंडळ, कासार्डे व तळेरे, दारूम, ओझरम, नांदगाव, खारेपाटण, गवाणे, गडमठ, पियाळी, वाघिवरे, फोंडा इ. मंडळांकडून सांगितले आहे.