*कोकण Express*
*”उद्योजकता ही काळाची गरज आहे, प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे यांचे प्रतिपादन*
*विजयालक्ष्मी एक्स्पो -२०२२ मध्ये १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी दिल्या मुलाखती.*
*कासार्डे ः संजय भोसले*
“उद्योजकता हि काळाची गरज आहे, यशस्वी उद्योजक होण्यासाठी आत्मनिरीक्षण करावे लागेल. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार करावा लागेल. स्वसंवाद साधावा लागेल, स्व:संवाद हा योग्य दिशा दाखवतो”. असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी चे प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे यांनी केले. ते तळेरे येथील, मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात आयोजीत विजयालक्ष्मी एक्स्पो -२०२२ या आभासी कार्यक्रमात बोलत होते.
विजयालक्ष्मी एक्स्पो च्या माध्यमातून दळवी महाविद्यालयात दर वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांना करियर बद्दल मार्गदर्शन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कॅम्पस मुलाखती घेवून विविध कंपन्या कडून रोजगार मिळून दिला जातो, यशस्वी उद्योजक होण्यासाठी मोफत मार्गदर्शन दिले जाते. यामाध्यमातून चांगले शिक्षण रोजगार व उद्योजकता विकास करून लक्ष्मी प्राप्तीचा राजमार्ग विद्यार्थ्यांना मिळतो. महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी आपल्या तीन वर्षाच्या काळात महाविद्यालयात हि संकल्पना रुजवली व वाढवली . शिक्षण(Education), रोजगार(Employment) व उद्योजकता (entrepreneurship) विकास या E³ = (mc²)³ या सुत्रानुसार ‘विजयालक्ष्मी एक्सपोच्या’ संकल्पनेचा अंगीकार केल्यास, देशाला पुढे नेणारी प्रचंड ऊर्जा या माध्यमातून मिळेल ही दळवी महाविद्यालयाची अपेक्षा आहे.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व महाविद्यालय गीताने झाली. हेमंत महाडिक सहा. प्राध्यापक यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. “अल्प फीस मध्ये दर्जेदार शिक्षणा सोबत रोजगार व उद्योजकता विकास हे कार्य सिंधुदुर्गातील दळवी महाविद्यालयात होत आहे” असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे दर्शन सोनी, सीईओ माई टीव्ही चँनल व उपसंपादक माहीम समाचार
या वेळी बोलतांना म्हणाले कि, आपण एकजूट झालोत , कॉरोना लस तयार केली,जगात भारताचे नाव केले ,हे शक्य झाले ,फक्त शिक्षण व युवकांमुळे ”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती वाडेकर पाहुण्यांचा परिचय ऋतुजा पाळेकर, ऋतुजा पाळेकर यांनी केला.
दळवी महाविद्यालयाची यशोगाथा पीपीटीच्या माध्यमातून रोहन कदम व मयुरी पाळेकर यांनी सादर केली.
आभार प्रदर्शन वैष्णवी कोळसुमकर हिने केले. लू परिश्रम घेतले.