*कोकण Express*
*नेहरू युवा केंद्रामार्फत ‘कोरोना जनजागृती ‘ या विषयावर पथनाट्याचे आयोजन*
*कासार्डे संजय भोसले*
युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने कणकवली , कुडाळ व मालवण तालुक्यात ‘कोरोना जनजागृती’ या विषयावर आधारित पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
‘कोरोना जनजागृती ‘ या मोहिमेअंतर्गत कणकवली तालुक्यात तळेरे बाजारपेठ, कणकवली बाजारपेठ, ओसरगाव टोल नाका, कसाल बाजारपेठ, ओरस बसस्टॅंड, मालवण बसस्टॅंड आणि मालवण धक्का या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय तळेरे या महाविद्यालयाचे इयत्ता अकरावीचे विद्यार्थी स्नेहल तळेकर, मिताली चव्हाण, दिक्षा तळेकर, अनुष्का घाडी, श्रावणी तळेकर, दिया कांबळे, हेमांगी भोगटे, प्रतिक्षा तांबे, यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. या पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थांनी कोरोना या महामारी विषयी जनजागृती केली.
यावेळी नेहरू युवा केंद्रचे कणकवली तालुका समन्वयक अक्षय मोडक, वर्षा केसरकर, मालवण तालुका समन्वयक ऐश्वर्य सुदर्शन खांदारे आदी उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा युवा अधिकारी मोहित सैनी व केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक अपेक्षा मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कणकवली , कुडाळ, मालवण तालुक्यामध्ये कोरोना जनजागृती पथनाट्य घेण्यात आले.