*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात अर्धशतकी व्याख्यान : सत्यवान रेडकर यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*
*कासार्डे ः संजय भोसले*
तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, शून्य मानधन असणारे प्रेरणादायी उच्चशिक्षित व्याख्याते व आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र सत्यवान यशवंत रेडकर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे अर्धशतक पुर्ण करणार आहेत. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक, सावंतवाडी आयोजित बी.के.सी.हॉल, सावंतवाडी येथे हे निःशुल्क व्याख्यानाचे ५० वे पुष्प होणार आहे.
आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाद्वारे करणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्याख्यानांचे अर्धशतक पूर्ण होणार आहे. आजवर त्यांनी महाराष्ट्रात ७० पेक्षा जास्त निःशुल्क व्याख्याने घेतली आहेत. जिल्ह्यातील मुले शालेय अभ्यासक्रमात राज्यात अग्रेसर असतात. मात्र प्रत्यक्षात पुढे मागे पडतात. त्यासाठी अशा युवकांना प्रेरणा देण्यासाठी, स्पर्धा परिक्षेची योग्य दिशा मिळण्यासाठी सत्यवान रेडकर मोफत व्याख्याने देत आहेत.
जिल्ह्यात १२ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी, १३ फेब्रुवारीला कणकवली तालुक्यात सकाळी ९.०० वाजता शेठ न. म. विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय, खारेपाटण आणि दुपारी १.३० वाजता विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, तळेरे येथे निःशुल्क मार्गदर्शन व्याख्याने आयोजित केली आहेत. या मार्गदर्शन वर्गाचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.