*कोकण Express*
*आम. नितेश राणेंना २ दिवसांची आधी न्यायालयीन मग पोलीस कोठडी!*
*कणकवली न्यायालयात झाली सुनावणी; दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात न्यायालयासमोर शरण गेलेल्या आमदार नितेश राणे गेले होते. त्यानंतर झालेल्या सुनावनीत दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्या.सलीम शेख यांनी आम. राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी 4 फेब्रुवारी पर्यंत ठोठवली.
यावेळी, आ. राणेंच्या वतीने न्यायालायात त्यांचे वकील संग्राम देसाई, वकील राजेंद्र रावराणे, वकील उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला तर सरकारी पक्षाचे वकिल अँड प्रदीप घरत हे ऑनलाईन व्ही सि. द्वारे ३.३० वा. ते सुमारे ६ वा. युक्तिवाद केला. यावेळी सरकारी वकिल यांनी पोलिसांच्या वतीने अधिक तपासासाठी १० दिवसाची पोलिस कोठडी मागण्यात आलेली होती. परंतु, न्यायालयाने दोन्ही पक्षाचे युक्तिवाद झाल्यावर अखेर २ दिवसांची पोलीस कोठडी आ. नितेश राणें यांना ठोठावली आहे.
दरम्यान, नरडवे नाका व कणकवली न्यायालय परिसरात चोख बंदोबस्त पोलिसांनी ठेवला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस सतर्क झाल्याचे दिसून येत आहे. न्यायालयात जाणाऱ्या गेटवर सर्वांना अटकाव येत आहे. तर भाजपा कार्यकर्ते तसेच राणे समर्थक न्यायाल्या जवळ गर्दी करत आहेत. तर खबरदारी म्हणून कणकवली शिवसेना कार्यलयाबाहेर देखील पोलिस बंदोबस्त करण्यात आलेला दिसतो.