*कोकण Express*
*अरीफ बगदादी यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे केले अभिनंदन*
*ओरोस ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी तसेच उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.माजी उपाध्यक्ष अरीफ बगदादी यांनी सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले.जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयात बगदादी यांनी अध्यक्ष दळवी आणि उपाध्यक्ष काळसेकर यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा बँकेवर भाजपाने एकहाती सत्ता मिळवली असून जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी, आंबा, काजू बागायतदार, विविध नगदी पिकउत्पादक शेतकरी, जिल्ह्यातील उद्योजक यांच्या उत्कर्षासाठी सकारात्मक पावले जिल्हा बँकेच्या माध्यमातून उचलावीत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्याचा आर्थिक विकास होवो अशा शब्दांत बगदादी यांनी शुभेच्छा दिल्या.


