*कोकण Express*
*राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल – आजपासून नवीन नियमावली जाहीर*
आज १ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र सरकारने कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली – अपेक्षेनुसार, निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे
मात्र राज्यात आता सूट देण्यात आलेल्या ठिकाणी जायचे असेल – तर लसीकरण अनिवार्य असेल
*पहा कशी आहे नियमावली ?*
● आजपासून स्पा, ब्युटी पार्लर आणि सलूनम 50 टक्के उपस्थितीत चालू राहतील – महत्वाचे म्हणजे अंत्ययात्रामध्ये उपस्थितीवर मर्यादा नाहीत.
● नॅशनल पार्क आणि जंगल सफारी तसेच पर्यटनस्थळे आधीप्रमाणे नियमीत वेळत सुरु होतील. येथे भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे
● उपहारगृह, नाट्यगृह तसेच चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेने चालू राहतील
● महत्वाचे म्हणजे मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील – तर खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के – किंवा 200 लोकांना प्रवेश देता येईल
● तसेच अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव तसेच वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने सुरु होतील – तर हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवेल
● *आज १ फेब्रुवारीपासून* – लागू झालेली नियमावली नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील शेअर करा