*कोकण Express*
*आम.नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला…!*
*आता पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागणार; वकिलांची माहिती…!*
*ओरोस ः प्रतिनिधी*
भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने दणका दिला असून नियमित जामीन अर्ज सुद्धा जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला आहे. त्यामुळे या निर्णया विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असे त्यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी सांगितले. तर पुढे कोणता निर्णय होतो ? हे आता पाहावे लागणार आहे.