मितभाषी,मृदू,प्रेमळ स्वभावाचे, हुरहुन्नरी तळेरे हायस्कूलचे शिक्षक :रमेश पंडीत कांबळे .आज सेवानिवृत्त

मितभाषी,मृदू,प्रेमळ स्वभावाचे, हुरहुन्नरी तळेरे हायस्कूलचे शिक्षक :रमेश पंडीत कांबळे .आज सेवानिवृत्त

*कोकण Express*

*मितभाषी,मृदू,प्रेमळ स्वभावाचे, हुरहुन्नरी तळेरे हायस्कूलचे शिक्षक :रमेश पंडीत कांबळे .आज सेवानिवृत्त*

*कासार्डे ः   संजय भोसले*

वा. म. माध्य. विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, तळेरेचे सहाय्यक शिक्षक श्री. रमेश पंडित कांबळे सर हे आज दि. 31 जानेवारी 2022 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
कांबळे सरांनी 10 वी नंतर डी.एड. ही शिक्षकांसाठीची दोन वर्षाची पदविका प्राप्त केल्यानंतर 10 जून 1985 रोजी वामनराव महाडिक विद्यालयात शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवली. या काळात विद्यालयात सुरू असणाऱ्या वसतिगृहाचे रेक्टर म्हणून  त्यांची नियुक्त करण्यात आली होती. त्या काळाच्या अतिशय खडतर, विपरीत परिस्थितीत सरांनी अतिशय चोखपणे वसतिगृहाचे कामकाज सांभाळले होते. सरांनी इयत्ता 5 वी ते 7 वी च्या वर्गांना इंग्रजी विषयाचा अपवाद वगळता सर्व विषयांचे अध्यापन केले आहे. विषय कोणताही असो प्रभावीपणे, मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कसब  वाखाणण्याजोगे राहिले आहे.
सरांनी विद्यालयात सुरू असलेल्या स्काऊट विभागाचे कामही उत्कृष्टपणे पार पाडले असून विद्यार्थ्यांच्या मनात सुसंस्कृत नागरिकत्व, जाज्वल्य देशाभिमान निर्माण करण्याचे कार्य स्काऊट मास्टर या नात्याने आजतागायत केले आहे.
अध्यापनाच्या कार्यासोबतच सरांनी शालेय पोषण आहार विभागाचे कामकाजदेखील अतिशय चोखपणे पार पाडले आहे. सरांच्या मितभाषी मृदू प्रेमळ स्वभावामुळे आजी, माजी विद्यार्थीवर्गात व सर्व शिक्षक सहकार्‍यांमध्ये ते प्रिय आहेत.
आज वयाच्या 58 व्या वर्षी आपल्या 36 वर्षे 6 महिन्यांच्या प्रदिर्घ सेवेनंतर सर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना सेवानिवृत्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!