नितेश राणेंचे पीए राकेश परब यांची 3 तास कसून चौकशी

नितेश राणेंचे पीए राकेश परब यांची 3 तास कसून चौकशी

*कोकण  Express*

*नितेश राणेंचे पीए राकेश परब यांची 3 तास कसून चौकशी*

सिंधुदुर्ग :

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांचा पीए राकेश परब सोमवारी कणकवली पोलिसांना शरण आला आहे. कणकवली पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्याकडून बंद खोलीत सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत कसून चौकशी सुरूच आहे.

जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान 18 डिसेंबर 2021 रोजी खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पुणे येथील सचिन सातपुते नामक आरोपीला अटक करण्यात आली होती. हा संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले. सचिन सातपुते याच्यासोबत राकेश परब याचे कॉल रेकॉर्ड आढळून आले. या पार्श्वभूमीवर या हल्ल्याप्रकरणी राकेश परब याचा सह आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल एक महिन्यानंतर राकेश परब हे कणकवली पोलिस ठाण्यात शरण आले आहेत आणि त्यांची कणकवली पोलिसांनी 3 तास कसून चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!