*कोकण Express*
*कणकवलीत व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता मेळाव्याला प्रारंभ*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ ३४ वा व्यापारी एकता मेळावा कणकवलीत ३१ जानेवारीला ऑनलाईन पद्धतीने प्रारंभ झाला आहे.कोरोना काळातील महामारीमुळे नियमानुसार दुसऱ्या वेळी ऑनलाइन पध्दतीने हा मेळावा होत आहे.या मेळाव्याचे दीपप्रज्वलन करत शुभारंभ करण्यात आला.
या मेळाव्याला ऑनलाइन केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री उदय सामंत,खा.विनायक राऊत, माजी मंत्री सुरेश प्रभू, आ.नितेश राणे,तर व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर,कणकवली तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर,चेंबर ऑफ कॉमर्स इंडट्रीज अध्यक्ष ललित गांधी,सभापती मनोज रावराणे,नगराध्यक्ष समीर नलावडे,सुनील सौदागर,मुख्य व्यवस्थापक एसबीआय लक्ष्मण सरबळकर,गुंतवणूक सल्लागार डी.बी देसाई,कर अधिकारी श्री.आजगेकर,विनय सामंत,सीए अमोल खानोलकर, राजन नाईक उपस्थित आहेत.हा मेळावा कणकवली येथील चौंडेश्वरी सभागृहात होत असून थेट प्रक्षेपण होत आहे. जिल्हा पदाधिकारी व कणकवली तालुक्यातील व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.