दोडामार्ग शिवसेनेची नवीन तालुका कार्यकारणी 10 फेब्रुवारीला जाहीर

दोडामार्ग शिवसेनेची नवीन तालुका कार्यकारणी 10 फेब्रुवारीला जाहीर

*कोकण Express*

*दोडामार्ग शिवसेनेची नवीन तालुका कार्यकारणी 10 फेब्रुवारीला जाहीर*

*आगामी निवडणुकीत शिवसेना नव्या जोमाने रिंगणात उतरणार*

*शिवसेनेचे नेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख  अरूण दुधवडकर*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर शिवसेनेची तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर आज शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दोडामार्गात त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान या बैठकीत तालुका कार्यकारिणी निवड होईल अशी शक्यता होती.मात्र आता ही तालुका कार्यकारिणी १० फेब्रुवारीपर्यंत जाहीर करणार असल्याचे अरुण दुधवडकर यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषदेत जाहीर केले.
दोडामार्गात शिवसेनेत गटबाजी असल्याचे त्यांनी नाकारत काही पदाधिकाऱ्यांत मतभेद व असंतोष असल्याने निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.मात्र आगामी निवडणुकीत शिवसेना नव्या जोमाने रिंगणात उतरणार असून शिवसैनिकांनी कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सांगितले.यावेळी आ.दीपक केसरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!