कासार्डे बंडवाडी येथे श्री गणेश मंदिर जिर्णोध्दार, कलशारोहण, मुर्ती प्रतिष्ठापना आणि माघी गणेश जयंतीमहोत्सवाचे आयोजन

कासार्डे बंडवाडी येथे श्री गणेश मंदिर जिर्णोध्दार, कलशारोहण, मुर्ती प्रतिष्ठापना आणि माघी गणेश जयंतीमहोत्सवाचे आयोजन

*कोकण Express*

*कासार्डे बंडवाडी येथे श्री गणेश मंदिर जिर्णोध्दार, कलशारोहण, मुर्ती प्रतिष्ठापना आणि माघी गणेश जयंतीमहोत्सवाचे आयोजन*

*कासार्डे  ः संजय भोसलेे*

श्री गणेश मंदिर कासार्डे बंडवाडी या मंदिराची सन.१९७५ साली कै. धोंडू भिकाजी पाताडे (पाटील) यांनी स्थानिक व मुंबईस्थित चाकरमानी यांच्या मदतीने स्थापना केली. गेली ४० वर्षे दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाने श्रीगणेश जयंती साजरी केली जाते. परंतु हे मंदिर जीर्ण झाल्याने मंडळाने जीर्णोद्धार करण्याचे ठरविले आणि मंदिराचे सुंदर आणि आकर्षक बांधकाम पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने श्री गणेश मंदिर जिर्णोध्दार, कलशारोहण, मूर्ती प्रतिष्ठापना व माघी गणेश जयंती उत्सव मंगळवार दि.१फेब्रूवारी पासून ते शनिवार दि.५फेब्रुवारी पर्यंत सलग ५दिवस अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांने हा सोहळा संपन्न होणार आहे.
हा महोत्सव शनिवार 5 फेब्रुवारी २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे.
*मंगळवार दि. १ फेब्रुवारी रोजी*
दु.३ते ६ वा. कासार्डे आनंदनगर ते गणेश मंदिर श्री गणेश मूर्ती,कलशाची मिरवणूक व शोभायात्रा सोबत कणकवली येथील कनकसिंधु ढोल पथक, कणकवली रात्री ९ वाजता स्थानिक भजने.
*बुधवार दि.२ फेब्रुवारी रोजी*
स.७.३० वा ते दु.२वा पर्यंत धार्मिक कार्यक्रम, प्रायश्चित्त, पुण्याहवाचन, आचार्यवरण, स्थलशुद्धी, शांती होम,जलाधिवास, पीठ देवता स्थापन, अग्नी स्थापन, वास्तू होम, ग्रह होम, शिखर कलश होम आदी कार्यक्रम.सायं.७ ते ८वा जय भवानी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ वरवडे बुवा .श्री मनोहर सावंत रात्री ८ ते ९ वाजता रासगरबा,रात्रौ.९वा श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, कासार्डे देऊलकरवाडी बुवा- रणदीप गायकवाड
*गुरुवार दि. 3 फेब्रुवारी रोजी*
सकाळी ठीक७.३० ते दु.२ वा. धार्मिक कार्यक्रम, स्थल शुद्धी, शिखर कलश प्रतिष्ठान,पर्याय होम, गणपती मूर्ती प्रतिष्ठापना, तत्वन्यास, महापूजा, बलीदान, पूर्णाहुती व आरती.
*शुक्रवार दि 4 फेब्रुवारी रोजी*
माघी गणेश जयंती सोहळा सकाळी ९ ते दु.१ श्रींची महापूजा, दुपारी१ ते २ वि.जन्मसोहळा, आरती, तीर्थप्रसाद ,दुपारी २ते३ महाप्रसाद ,दुपारी ३ते सायं.६ वा .सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन गोराई शाखा आयोजित भव्य समाज प्रबोधन आणि सुस्वर संगीतमय उपासना ज्येष्ठ प्रबोधनकार शिवाजीराव पालव( मुंबई )विषय- ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ सायं.६ते ७ फनिगेम्स,सायं ७ते ८ वा रास-गरबा व फॅशन शो स्पर्धा, रात्रो ९ते १० सुस्वर भजन कु. आर्या घाडी तळेले घाडीवाडी, रात्रौ १०वा सांस्कृतिक रंगबहार कार्यक्रम सोबत नाटिका मालवणी शोले ,(सादर कर्ते मुंबई मंडळ)
*शनिवारी दि.५फेब्रुवारी रोजी*
दु.१२ते ३ श्री सत्यनारायण महापूजा, आरती तीर्थप्रसाद दू.३ते ५ हळदी कुंकू समारंभ ,सायं.४ते.६ मन मंदिरा गजर नामाचा (भक्तीगीत, भावगीत, नाट्यगीत यांचा सुरेल नजराणा गायक-कु.हर्ष संजय नकाशे (सौ. विश्रांती कोंयंडे यांचा शिष्य)
सायं.६ते ७ फनिगेम्स ,सायं.७ते ९ संगीत भजन बुवा श्री दिगंबर केसरकर (कासार्डेभोगले-पारकरवाडी) रात्री १० वा. खुल्या ग्रुप डान्स स्पर्धा
तरी या सर्व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी व रसिकांनी घ्यावा असे आवाहन श्री गणेश कृपा उत्कर्ष मंडळ बंडवाडीचे अध्यक्ष श्रीपत पाताडे व सचिव हरिचंद्र बंड तसेच श्री गणेश मंदिर जीर्णोद्धार समिती कासार्डे बंडवाडीचे संस्थापक सुरेश पाताडे,अध्यक्ष रवींद्र पाताडे व सचिव सुभाष पाताडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!