*कोकण Express*
*उपोषणकर्ते उमेश वाळकेंची मुंबईच्या माजी महापौरांनी घेतली भेट*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
कणकवली येथील नगरपंचायत हद्दीतील सर्वे नंबर १५९अ , हिस्सा नंबर ७१ या मिळकती मधील १०८.१४ चौ.मी. इमारत वाणिज्य तळमजला व निवासी पहिला मजला अशा स्वरुपाचे बांधकाम करण्यासाठी विकास शुल्क व इतर शुल्क भरूनही कणकवली नगरपंचायतीने बांधकाम परवानगी दिलेली नाही. त्यामुळे माजी नगरसेवक उमेश वाळके यांनी कुटुंबियांसह प्रांताधिकारी कार्यालया समोर प्रजासत्ताक दिनी साखळी उपोषण सुरू केले आहे.उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.दरम्यान रात्री मुंबईचे माजी महापौर यांनी उपोषण स्थळी भेट दिली यावेळी उमेश वाळके यांनी वस्थुस्थितीची माहिती देत.आपली कैफियत त्याच्यासमोर मांडली.महापौर यांनी याप्रश्नी आपण लक्ष घालू असे आश्वासन त्यांनी दिले.