जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा तालुक्यातील विविध सहकारी संस्थां,भाजप नगरसेवक यांचे वतीने सत्कार

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा तालुक्यातील विविध सहकारी संस्थां,भाजप नगरसेवक यांचे वतीने सत्कार

*कोकण Express*

*जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा तालुक्यातील विविध सहकारी संस्थां,भाजप नगरसेवक यांचे वतीने सत्कार*

*देवगड ः अनिकेत तर्फे*

जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी यांचा जाहीर सत्कार देवगड तालुक्यातील सहकारी संस्था यांच्या वतीने जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे,माजी आमदार ऍडअजित गोगटे, बँक संचालक ऍड प्रकाश बोडस, प्रकाश राणे, देवगड अर्बन बँक चेअरमन दिलीप उर्फभाई आचरेकर, ख.वि. संघ चेअरमन जयदेव कदम,उल्हास मणचेकर अमित साटम,गोविंद उर्फ पपु लाड,नरेश लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा बँक तसेच तालुक्यातील विकास संस्थांच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आमदार अजित गोगटे तसेच जिल्हा बँक नवनिर्वाचित संचालक प्रकाश बोडस यांचा देखील जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी ख.वि संघ चेअरमन जयदेव कदम यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर सूत्रसंचालन रेश्मा जोशी यांनी केले. या निमित्ताने देवगड जामसंडे नगरपंचायत नवनिर्वाचित भाजप नगरसेवक यांच्या वतीनेही जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल, तन्वी चांदोस्कर, प्रणाली माने, मनीषा जामसंडेकर, आद्या गुमास्ते, अरुणा पाटकर, रुचाली पाटकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!