*कोकण Express*
*सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचा ३१/०१/२०२२ रोजी होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यास जाहीर पाठींबा*
*….पण व्यवसाय बंद ठेऊन सहभाग या आवाहनाला सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स अससोसिएशन चा विरोध*
*सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन अध्यक्ष राजन राणे*
*सिंधुदुर्ग ः संंजना हळदिवे*
सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आयोजित दिनांक ३१/०१/२०२२ रोजी होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्यास जाहीर पाठींबा. व्यापारी वर्गाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून सिंधुदुर्ग मधील सर्व व्यापारी बंधूना एकत्रित ठेवण्याचे चांगले काम ही संघटना करीत आहे. सिंधुदुर्ग डीलर्स अससोसिएशन चा स्थानिक व्यापारी बंधू च्या न्याय हक्का साठी झगडणाऱ्या सर्व संघटनाना कायमच पाठिंबा दर्शवीला आहे,परंतु व्यवसाय बंद ठेऊन सहभाग या आवाहनाला सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स अससोसिएशन चा विरोध आहे दोन वर्षात कोरोना महामारीमुळे आमच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील बहुतांश व्यापाऱ्यांचे फारच आर्थिक नुकसान झाले आहे अशा परिस्थितीमध्ये व्यवसाय बंद ठेवणे हे अयोग्य वाटते,तसेच सदर मेळावा हा व्हर्च्युअल (ऑनलाईन) पध्धद्धतीने असल्याने आपण व्यवसाय चालू ठेवूनही मेळाव्यात सहभागी होऊ शकता.
सिंधुदुर्ग डीलर्स अससोसिएशन च्या वतीने सदर जाहीर आवाहन करण्यात येते कि इलेक्ट्रॉनिक्स साहित्य पुरवणारी आमची सर्व दुकाने सुरु राहुन ऑनलाईन लिंक वर join होऊन आमचे सर्व व्यापारी आपली बहुमूल्य उपस्थिती सिंधुदुर्ग व्यापारी महासंघ आयोजित व्यापारी एकता मेळाव्यास दर्शवतील.