*कोकण Express*
*सेट परीक्षेत प्रा.मिनाक्षी सावंत यांचे यश*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
कणकवली महाविद्यालयाच्या प्रा.मिनाक्षी नंदादीप सावंत यांनी नुकत्याच झालेल्या राज्य प्राध्यापक पात्रता (सेट) परीक्षेत यश संपादन केले आहे. अर्थशास्त्र विषयातून सौ.सावंत ह्या सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. गेली दहा वर्षे त्या कणकवली महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.