*कोकण Express*
*वाढीव वीज बिलाच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांचें महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन…*
*पोलीस आणि आंदोलकांत बाचाबाची; राज्य सरकारचा निषेध…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वाढीव वीज बिलाच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयाच्या गेटवर आंदोलन केले. कार्यकारी अभियंत्यांना भेटण्यासाठी केवळ पाच जणांचे शिष्टमंडळ जाईल अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतल्याने, पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अखेर महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी गेटवर येऊन भाजप कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी राज्य सरकार निषेधाच्या घोषणा दिल्या.
वाढीव वीज बिलांच्या विरोधातील आजच्या आंदोलनात भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके, उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, बबलू सावंत, कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, माजी उपसभापती महेश गुरव, विजय चिंदरकर,युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, विजय इंगळे, राजू पेडणेकर आदी सहभागी झाले होते.