*कोकण Express*
*चला उठा पुन्हा एकदा शाळेची वाट धरा*
*जिल्ह्यातील शिक्षकांच्या सक्तीने केल्या जाणार्या RTPCR टेस्टला शिक्षक भारती सिंधुदुर्गचा तिव्र विरोध*
*कासार्डे ः संजय भोसले*
महाराष्ट्र राज्य शासनाने शाळा सुरू करण्याच्या आदेश काढल्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील शाळा सोमवार दिनांक 31 /01 /2022 .पासून नव्याने भरत आहेत .ही एक जमेची बाजू असली तरी काही अटी आणि नियमानी वादात भर पडली आहे.
सोमवारपासून शाळा सुरू करण्यापूर्वी फक्त शिक्षकांचीच RTPCR चाचणी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. ते कशासाठी? तसे पाहता शाळा फक्त विद्यार्थ्यांसाठी बंद होती कोणीही शिक्षक शाळा किंवा मुख्यालय सोडून कुठेही गेलेले नाहीत. तर दररोज सुट्टीचा दिवस वगळता शाळेतच हजर असताना त्यांची खरोखर RTPCR चाचणी करणे गरजेचे आहे का?
तसेच जवळ जवळ सर्वच शिक्षकांची दोन्ही डोस (व्हॅक्सीनचे) सक्तीने पूर्ण करून घेतले असताना परत एकदा या RTPCR चाचणीची सक्ती का?अशा प्रकारे प्रत्येक वेळी शाळा सुरू करताना चाचणी बंधनकारक असेल तर मग दोन्ही डोस काय गंमत म्हणून दिले होते काय ?असा सवालही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गातून विचारला जातोय.
तसे पाहता शाळा कधीच बंद नसून त्या सुरूच आहेत असे असताना शाळेत येऊ घातलेल्या विद्यार्थ्यांची किंवा त्यांच्या पालकांची RTPCR चाचणी न करता केवळ शिक्षकांनाच सक्ती करणे हे चुकीचे वाटते. शिक्षकांमुळेच कोवीडचा प्रसार होतो हा संदेश जनमानसात पसरणार असून, हे या टेस्टच्या आदेशाने आणखी अधोरेखित होईल . हा शिक्षकांवर दाखवलेला गैर विश्वासच नव्हे तर ही बाब अन्यायकारक आहे असे सर्वच थरातून बोलले जात आहे.
तरी सक्तीने RTPCR चाचणी करण्याचा आदेश तात्काळ रद्द करावा अशी शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ,व माननीय शिक्षणाधिकारी .यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शाळा गेल्याच आठवड्यात सुरू झालेल्या आहेत त्या ठिकाणी कोणत्याही शिक्षकांची RTPCR ची सक्ती केलेली नाही. असे असताना या जिल्ह्यात हा सक्तीचा आदेश तात्काळ रद्द करावा, अन्यथा टेस्ट करण्यावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने देण्यात आलेला आहे.