*कोकण Express*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड*
*अध्यक्षपदी हनिफभाई पिरखान तर सचिवपदी मनोजकुमार वारे यांची निवड*
*कासार्डे ः संजय भोसले*
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेची कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी हनिफभाई पिरखान यांची तर सचिव म्हणून मनोजकुमार वारे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांनी कणकवली तालुका कार्यकारणीची निवड २६ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केली.
कणकवली तालुका अध्यक्ष हनिफभाई पिरखान,उपाध्यक्ष- राजेश जाधव, उपाध्यक्ष- संदेश बांदेकर,सचिव- मनोज कुमार वारे, खजिनदार- रुपेश खाड्ये, संघटक- ऋषिकेश (दादा) कोरडे,जनसंपर्क अधिकारी- प्रवीण गायकवाड,कणकवली तालुका प्रसिद्धीप्रमुख- श्रीयश कदम,सल्लागार रत्नाकर देसाई व चंद्रशेखर उपरकर तर सदस्य डाॅ.हर्षलकुमार पटेल, भरत तळवडेकर ,अभय खडपकर, संदिप रेवंडकर तर तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून श्रीयस कदम यांची निवड करण्यात करून नवीन कार्यकारणी जाहीर केली.सदर कार्यकारणीचा कार्यकाल जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ पर्यंत असणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर व जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय खानविलकर यांनी नुतन कार्यकारीणी पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.