*कोकण Express*
*कुडाळ पंचायत समिती मध्ये लाखो रुपये खर्च करून, महिलांसाठी बांधण्यात आलेला अस्मिता कक्ष पडला आहे; धूळ खात*
*गेली दोन वर्षे सत्ताधारी व विरोधक मात्र गप्प तर खर्चाची केली मोठी उधळपट्टी…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
तर कुडाळ पंचायत समिती मध्ये बांधण्यात आलेल्या या अस्मिता कक्षावरून असे दिसून येत आहे की,महिलांना मानसन्मान मिळत नसेल तर मग या लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून का द्यावे.
कुडाळ:-कुडाळ पंचायत समिती मध्ये बांधण्यात आलेला “अस्मिता कक्ष” अक्षरशःधूळ खात पडला आहे.असे असताना देखील शासनाच्या माध्यमातून या कक्षावर लाखो रुपयांचा निधी खर्च केल्याचे बोलले जात आहे.मात्र प्रत्यक्षात तो कक्ष बंद अवस्थेत असल्याने महिलांना वापरता येत नाही.तर या अस्मिता कक्षाच्या दरवाजाच्या दर्शनी दरवाजाखाली मोठे भगदाड पडले आहे.
आज २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने कुडाळ पंचायत समिती मध्ये पाहणी केली असता “अस्मिता कक्ष” लाखो रूपये खर्च करून देखील बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आबा खवणेकर,जिल्हा उपाध्यक्ष समील जळवी,जिल्हा कार्यकारणी सदस्य मिलिंद धुरी,जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद कांडरकर उपस्थित होते.
काही वर्षांपूर्वी कुडाळ पंचायत समितीच्या वतीने महिलांसाठी बांधण्यात आलेल्या याच कक्षाचे नाव हिरकणी कक्ष म्हणून नाव देण्यात आले होते.आता याच कक्षाचे नाव अस्मिता कक्ष असे करण्यात आले आहे.तर याठिकाणी बॅनर लावलेले दिसत आहे.तर महिलांसाठी बांधण्यात आलेल्या या कक्षावर दोनदा खर्च केल्याचेही बोलले जात आहे.तर बॅनरवरही हजारो रुपयांची उधळपट्टी झाली आहे.अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
एकीकडे शासन म्हणते महीला सक्षमीकरण करा? तर दुसरीकडे कुडाळ पंचायत समितीमध्ये महिलांसाठी बांधण्यात आलेल्या अस्मिता कक्षाची लाखो रुपये खर्च करून दुरावस्था झाली आहे.तो कक्ष बंद अवस्थेत दिसून येत आहे.तर दर्शनी भागातील दरवाजाला मोठे भगदाड पडले आहे.मात्र याकडे सत्ताधारी व विरोधक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याचेही दिसून येत आहे.तर हा महिलांचा महत्त्वाचा विषय एकही पंचायत समिती सदस्यांना सोडवता का आला नाही.असा सवाल विचारला जात आहे.