*कोकण Express
*राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार; राज्य सरकारचा निर्णय*
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
*सविस्तर बातमी*
■ 1000 चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे. याबद्दल बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता 1000 चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
■ शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे. राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.